अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यावेळी जय पवार यांच्यासोबत सूरज चव्हाण देखील असल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जय पवार यांनी थेट आंतरवाली सराटी गाठली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जय पवार यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे.

४ मे रोजी रविवारी सकाळी जय पवार मुंबईतून हेलिकॉप्टरने थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. तेथून कारने जय पवार हे अंतरवाली सराटी येथे पोहोचले. याठिकाणी जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. . जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.

Protected Content