नियमांचे उल्लंघन; अमळनेरात गुन्हे दाखल

शेअर करा !

अमळनेर प्रतिनिधी । जमावबंदीसह शासनाच्या अन्य नियमांचे उल्लंघन करून धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल येथील पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

store advt

शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन तोंडाला मास्क न लावता तसेच फिजिकल डिस्टन्स न पाळता ईदनिमित्त धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचा प्रकार येथे शनिवारी उघडकीस आला आहे. कसाली मोहल्ला व दगडी दरवाजा परिसरात हा प्रकार समोर आला होता. याची पोलीस प्रशासनाने दखल घेत यामध्ये सहभागी झालेल्या अमळनेरातील २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!