भुसावळात काँग्रेसतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रमाबाई आंबेडकर नगरात काँग्रेस समितीतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

store advt

येथील माता रमाबाई आंबेडकर नगरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रम समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ शहर काँग्रेस अनुसूचितु जाती विभागाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी भारतरतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी अनु जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय तुरकेले, शहराध्यक्ष सुनिल जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार,काँग्रेस असंघटित कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.शरद तायडे, शहराध्यक्ष अ‍ॅड.रमू पटेल,विक्रम वानखेडे,अनिल मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!