लाखा कोण ते शोधा – सचिन सावंत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले यात लाखा कोण हे शोधून काढा, असा तिखट सल्ला कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीत करीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या जोरावर दोन उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखणाऱ्या शिवसेनेला भाजपाने जबर धक्का देत त्यांचा तिसरा उमेदवार निवडून आणला आहे. यात राज्यसभा निवडणुकीत दिसून आलेले ‘लगान’ चित्रपटातील ‘लाखा’, कोण हे महाविकास आघाडी सरकारने विधान परिषद निवडणुकी अगोदर तात्काळ शोधून काढा, असे सूचक ट्वीट करून भाजपा उमेदवाराला मतदान करीत फुटलेल्या आमदारांना टोला लगावला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!