मोदी सरकारची आठ वर्ष पुर्ण : यावल येथे विविध कार्यक्रम

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आठ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त यावल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील फैजपूर येथे विकास तीर्थ बाईक रॅली काढण्यात आली.

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची यशस्वी आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभर सेवा,सुशासन,गरिब कल्याण या पर्वाच्या माध्यमातून भारतीय  जनता पार्टी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्राचे माजी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, रावेर लोकसभा क्षेत्राचे खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह सर्व जिल्हाभरातील पक्षाचे सर्व आमदार प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले.

जळगाव जिल्हा युवा मोर्चा च्या माध्यमातून आज यावल तालुक्यातील फैजपूर येथे विकास तीर्थ बाईक रॅली काढली होती. भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष  श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वात या रॅलीची सुरवात करण्यात आली. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी यांनी झेंडा दाखवून रॅली सुरुवात केली.

या रॅलीत सागर कोळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष , माजी नगराध्यक्ष फैजपूर पिंटु राणे,उमेश बेंडाळे (यु.मो.कार्यकर्ते न्हावी ), सागर चौधरी (भाजपा युवामोर्चा जिल्हाउपाध्यक्ष )भुषण नेहेते,योगेश खेवलकर सरचिटणीस, वैभव वकारे उपाध्यक्ष युवा मोर्चा, शरद तायडे,रजनीकांत पाटील, निलेश पाटील,प्रशांत सरोदे, प्रतीक वारके,रामा होले,जयेश चौधरी, सचिन पाटील, कोमल तळेले, नितीन सपकाळे, पंकज मोरे, सतीश कोळी, श्याम भंगाळे यु.मो शहराध्यक्ष फैजपूर, मोहन होले,अक्षय परदेशी ,अक्षय कोळी,प्रशांत तायडे यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहुन रॅलीत आपला सहभाग नोंदविला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!