मुंबई प्रतिनिधी । संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक स्तंभातून फुटीरतावादीला चिथावणी देणारे लिखाण केले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.
अतुल भातखळकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून राऊतांवर टीका केली आहे. यात ते म्हणाले आहेत की, संजय राऊत यांनी आज रोखठोक सदरातून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. देशामध्ये विभाजनवादी प्रवृत्ती वाढत आहेत आणि रशिया प्रमाणे राज्य फुटून निघतील. अशा स्वरूपाचं देशद्रोही वक्तव्यं त्यांनी आज आपल्या लेखातून केलं आहे. त्यांनी एवढं देखील भान नाही, राज्य फुटली ती रशियातून नव्हे सोव्हिएत यूनियनमधून. पण ज्या काँग्रेसने देशाची फाळणी केली. तुकडे तुकडे गँगचं समर्थन केलं. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर राऊतांना असे देशद्रोही विचारच सुचणार. माझी तर केंद्र सरकारकडे मागणी आहे, देशातील फुटरतावादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारं लिखान केल्याबद्दल संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मी करतो आहे.
संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतीलत्यांना मला सांगावेसे वाटते की हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेलाय. तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका असं देखील भातखळकर यांनी म्हटलेलं आहे.