Home राजकीय पराभवाच्या भितीनेच भाजपची माघार : संजय राऊत

पराभवाच्या भितीनेच भाजपची माघार : संजय राऊत

0
52


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अंधेरीत आपल्या उमेदवाराचा दारूण पराभव होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानेच भाजपने माघारीचा मनभावीपणा दाखविल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी विद्यमान स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ४५ हजारांच्या मताधिक्यानं जिंकणार होता. त्यामुळंच भाजपनं उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपानं उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपनं या मतदारसंघात वैयक्तिक सर्वे केला होता. त्यामध्ये त्यांना ऋतुजा लटके विजय होणारच यासंदर्भात माहिती मिळाली होती. यामुळे त्यांनी माघार घेतली. तसेच, या पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ’स्क्रिप्ट’चाच भाग असल्याची टीका देखील त्यांनी केली.


Protected Content

Play sound