मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा – महापालिका कामगार युनियनची मागणी (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  महापालिका  कामगार युनियनचे विविध मागण्यांसाठी महापालिकेसमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

 

जळगाव महापालिकेत काम करणाऱ्या सर्वांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतू याच महापालिकेत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना देखील सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी जळगाव महापालिका कामगार युनियन व अखिल भारतीय सफाई मजदू काँग्रेसच्या वतीने सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेसमोर भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. परंतु जळगाव महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महापालिकेतील कर्मचारी दोन ते तीन गटात विभागला गेला आहे. गटा-तटाच्या राजकारणामुळे कर्मचारी वर्ग दुरावला गेला आहे. अशावेळी घरचा कर्ता पुरुष या नात्याने महापालिका प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सभागृहात एकत्र बोलून सातवा वेतन आयोगात काय अडचण येत आहे. याबाबत मार्गदर्शन आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे काहींना सातवा वेतन आयोगापासून वंचित राहावं लागत आहे. यापूर्वी देखील महापालिका प्रशासनाला उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, याबद्दल मागणी केली होती. तसेच मागणी मान्य न झाल्यास भिक मागवा आंदोलन करण्याची नोटीस देखील देण्यात आली होती. महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने अखेर सोमवार १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहर महापालिका कामगार युनियन आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने जळगाव महापालिकेसमोर भिक मागो आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, प्रभाग समिती अधिकारी उदय पाटील आदी सहभागी झाले आहेत.

 

Protected Content