ओबीसी नेते भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; वरणगाव पोलीसांनी निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्याबद्दल अतिशय उद्धट आणि मगरुरीच्या भाषेत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलचा महाराष्ट्र माळी समाज महासंघ, समता परिषद यांच्या वतीने निषेध करून पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन वरणगाव पोलीस स्टेशन येथील डीवायएसपी नितीन गणापुरे यांना आज मंगळवारी देण्यात आले.

महाराष्ट नव्हे तर संपूर्ण देशाचे ओबीसी नेते असलेले महाराष्ट्रचे मंत्री छगनराव भुजबळ यांनी पश्चिम बंगाल येथील लागलेल्या निवडणूक निकाल बद्दल ममता बॅनर्जी या ‘झाशिच्या राणी सारखे लडल्या’ आणि निवडणुकीत यश मिडवले. अशी प्रतिक्रिया माध्यमाना दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगनराव भुजबळ यांना अतिशय उद्धट भाषेत धमकी देऊन ”भुजबळ तुम्ही जमिनावर बाहेर आहेत विसरू नका, तुम्हाला आम्ही पाहून घेऊ” अशी धमकी दिली. चंद्रकांत पाटील यांनी विसरू नये की, देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील जमिनावर बाहेर आहेत. छगनराव भुजबळ यांची चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा पाटील यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. असे डीवायएसपी नितीन गणापुरे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यापुढे तोंड सांभाळून बोलावे. केंद्राची धमकी देऊन छगन भुजबळ यांना घाबरू नये. भुजबळ साहेबांसोबत संपूर्ण महाराष्टातील ओबीसी समाज आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर देखील उतरल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्यावे असेही निवेदनत म्हटले आहे.

 

निवेदनावर माळी महासंघाचे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष तथा समता परिषदचे तालुकाध्यक्ष संतोष माळी, माळी महासंघाचे जिल्हा संघटक प्रल्हाद माळी, माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, भुसावळ तालुकाध्यक्ष विजय माळी, उपाध्यक्ष निलेश माळी, वरणगाव शहराध्यक्ष सचिन माळी, टिनू माळी, आकाश महाजन, विवेक माळी, विशाल माळी, भुषण माळी, वैभव माळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.