केळीवर विषाणूचा प्रादूर्भाव : आ. शिरीष चौधरी यांनी केली पाहणी

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केळी पीकावर सीएमव्ही विषाणूचा प्रादूर्भाव झाला असून आज आमदार शिरीषदादा चौधरी यांनी याची पाहणी केली.

रावेर तालुक्यातील केळी बागांवर पडलेला सी.एम.व्ही हा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भावच्या पाहणी काल आमदार चंद्रकांत पाटलांच्या पाहणी नंतर आज आमदार शिरीष चौधरी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुध्दा होते.

आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर पातोंडी, थेरोळे, धुरखेडा या गावातील केळी बागांची पाहणी केली या बागांमध्ये सी.एम.व्ही हा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असून नविन लागवड असलेल्या बागांमध्ये इरव्हिनिया रॉट या रोगाची लागण झालेले असल्याचे आढळून आलेले आहे. रावेर व यावल तालुक्यातील केळी पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून निर्यातक्षम केळी उत्पादनात अग्रेसर आहे. परंतु या रोगामुळे केळी पिकाचे नुकसान होत असून शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सी. एम. व्ही. या रोगापासून नुकसान टाळण्यासाठी शासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात येवून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत असे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सांगितले.

यासंदर्भात आ. शिरीषदादा चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे, राज्यमंत्री ना. विश्‍वजित कदम, एकनाथ डवले कृषी सचिव, मुंबई व जिल्हा कृषी अधिकारी जळगाव यांना पत्राद्वारे लवकरात लवकर उपाययोजना करण्यासंदर्भात विनंती केलेली आहे.

यावेळी प्रगतीशील शेतकरी जगू सर पातोंडी व सुरेश पाटील थेरोळे यांच्या शेतात जावून पाहणी करतांना आ.शिरीष चौधरी, यांच्या सबत तहसिलदार देवगुणे, कृषी मंडळ अधिकारी काळे, माजी जि.प. सदस्य रमेश नागराज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील, प.स.सदस्य योगेश पाटील, माजी सभापती कृउबास निळकंठ चौधरी, यशवंत धनके, महेंद्र पाटील, ईश्‍वर अटकाळे,, राजू सवर्णे आदी उपस्थित होते.

Protected Content