एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे.

कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर राज्यातील परीक्षा रद्द करण्याची आग्रही भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. तसेच संसर्ग कायम असल्याने शाळा देखील लवकरच खोलण्यात येणार नसल्याचे संकेत मिळालेले असतांना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्‍या राज्यसेवा पूर्व परिक्षेची तारीख बदलण्यात आली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परिक्षा १३ सप्टेबरला होणार होती. नंतर त्यात बदल करण्यात आला. सुधारीत वेळापत्रकानुसार ही परिक्षा २० सप्टेंबरला होणार होती. मात्र, आता पुन्हा एकदा आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. पण, नवीन तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. तरी नवे वेळपत्रक लवकरच जाहीर केले जाईल अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.

Protected Content