Home Uncategorized कोल्हे हिल्स येथील हॉटेलवर विनापरवाना दारूची विक्री; चालकाला अटक

कोल्हे हिल्स येथील हॉटेलवर विनापरवाना दारूची विक्री; चालकाला अटक

0
114


जळगाव प्रतिनिधी । कोल्हे हिल्स परिसरातील एका हॉटेलात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकाला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ३ हजार १३० रूपयांची दारू हस्तगत करण्यात आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दिपक शिवदास राठोड (वय-४१) रा. अर्जुन नगर, जळगाव असे हॉटेल चालकाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हे हिल्स परिसरातील बॉलीवुड हिल्स नावाच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांना रविवारी ९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण सागर, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, दिपक कोळी, प्रशांत ठाकूर व चालक अशोक महाले यांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बॉलीवुड हिल्स नावाच्या हॉटेलमध्ये छापा टाकून सुमारे ३ हजार १३० रूपये किंमतीची देशी विदेशी दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी हॉटेल चालक दिपक शिवदास राठोड (वय-४१) रा. अर्जुन नगर, जळगाव याला अटक केली. पोलीस कॉन्स्टेबल भूषण सपकाळे यांच्या फियादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound