सावदा शहरातील पाणीपट्टी नियमित दराने आकारणीच्या मागणीस मान्यता

सावदा , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील वाढीव हद्द वाढीनुसार परिसरातील रहिवासी नागरिकांना पाणीपट्टी नियमित दराने आकारणी करण्याच्या मागणीचे निवेदनास मान्यता देण्यात आली,   माजी नगराध्यक्ष राजेद्र चौधरी यांचेसह नगरसेवक फिरोजखान पठाण यांनी सावदा नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना  निवेदनाद्वारे पाणीपट्टी नियमित दराने आकारणी करावी या मागणीस मान्यता दिल्यामुळे मुखाधिकारी यांचे आभार मानले.

सावदा शहराची हद्दवाढ विचारात घेता, नवीन रहिवाशी परिसरातील नागरिकांना २९०० रुपये पाणीपुरवठा कर आकारणी केली जात असून हि कर आकारणी रद्द करावी. हद्दवाढ झालेल्या नागरिकांकडून १४०० रुपये  पाणीपट्टी नियमित दरानुसार करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष राजेद्र चौधरी, नगरसेवक फिरोजखान पठाण यांनी मुख्याधिकारी यांचेकडे केली होती. या निवेदनावर सत्तारशाह रमजान शाह, जावेद बाबू शेख, किरण सुपडू तायडे, दिलीप राजू तायडे, बेबाबाई दशरथ सोनवणे, दिलीप सुरवाडे, सुरेश मीठाराम तायडे, प्रकाश नेसरे आदीच्या सह्या आहेत.

माजी नगराध्यक्ष राजेद्र चौधरीसह  नगरसेवक फिरोजखान पठाण नागरिकांच्या मागणीस  मान्य करीत प्रचलित दरानेच करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांचेकडून देण्यात आले. प्रचलित दरानुसारच नागरिकांनी २०२१-२२ ची पाणीपट्टी १४०० रुपये वेळेत भरून नगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष राजेद्र चौधरी यांनी केले आहे.

 

 

Protected Content