बोरावल खुर्द येथे श्रमसंस्कार शिबिर ; विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद               

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर बोरावल खुर्द येथे सुरु आहे.

या शिबीरात नुकतेच ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रारंभी समाजसेवक सचिन मोरे यांच्या हस्ते स्वच्छता अवजारांचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

सरपंच सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत परिसर, ग्रामीण रुग्णालय, विठ्ठल मंदिर चौक, पाणीपुरवठा टाकी, गावातील मुख्य रस्ता आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यावेळी घनकचरा संकलन करून ट्रॅक्टरद्वारे विल्हेवाट लावण्यात आली.

या अभियानात स्वयंसेवक युगल पाटील याने गाडगेबाबांची वेशभूषा धारण करून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच गावातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. विठ्ठल मंदिराच्या चौकात सानिका सावकारे व ग्रुप यांनी ‘माझं गाव स्वच्छ गाव ‘या विषयावर पथनाट्य सादर करून प्रबोधन केले सादर केले.

दुपारच्या बौद्धिक सत्रात उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील यांनी कोरोना नंतर- भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्रान केले .यात कोरोनानंतरची भारतीय अर्थव्यवस्था या अंतर्गत कृषी क्षेत्र , सेवा विभाग व बांधकाम विभाग या क्षेत्रा मध्ये आर्थिक विकास कसा खुंटला तसेच बेरोजगारी कशी वाढली यासंदर्भात सविस्तर विवेचन केले. दुसऱ्या सत्रात यावल पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. पी . कोते यांनी सेंद्रिय शेती- काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले की रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर झाल्याने विषयुक्त अन्न तयार होत आहे. त्यामुळे कॅन्सरच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे .विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे. नंतर वाचनाचे फायदे या विषयावर गट चर्चा घेण्यात आली. यात सर्व गटातील प्रतिनिधींनी चर्चेमध्ये सहभागी घेतला.

ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. डी. पवार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधा खराटे, प्रा. एम. पी. मोरे, प्रा. सुभाष कामडी, अनिल पाटील, नोमेश्वर तायडे, हेमंत भालेराव, देवेंद्र बारी, सचिन बारी, युक्ती चौधरी आदींनी कार्यक्रम परिश्रम घेतले.

Protected Content