कोरपावली व महेलखेडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा तहकूब

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतची ऑनलाईन ग्रामसभा तर महेलखेडी ग्रामपंचायतीची ऑफलाईन सभा विविध कारणांनी तहकुब झाल्या आहेत.

आज येथे गावपातळीवरील सर्वसामान्य ग्रामस्थांचे हक्काचे व्यासपिठ असलेल्या ग्रामसभा आज आयोजीत करण्यात आल्या होत्या. मात्र अस्पष्टता आवाज अनेकांनी आपले मोबाईल म्यूट न केल्याने सुरू असलेला गोंधळ व गावातील काही नागरिकांकडे मोबाईल उपलब्ध नसल्याने तसेच इतर अनेक कारणाने तथा तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांनी ग्राम पंचायत कार्यालया जवळ एकच गर्दी करून ऑनलाईन सभेस अडचणी निर्माण होत आहे. अश्या प्रकारे सूचना काही नागरिकांनी सम्बंधीत सरपंच विलास अडकमोल व ग्रामसेवक आर डी बाविस्कर यांनी त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. 

या कारणाने उपस्थित ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या अनुषंगाने आजची पहिली ऑनलाईन ग्रामसभा अखेर तहकूब झाल्याचे घोषित करून ही सभा पुढे ढकलण्यात आल्याचे ग्रामपंचायत सुत्रांकडून जाहीर करण्यात आले. पुढील सभे बाबत ग्रामस्थांना लवकरच कळविण्यात येईल असे जाहीर केले. 

याप्रसंगी सरपंच  विलास अडकमोल ग्रामसेवक, आर.डी. बाविस्कर यांच्या सह अन्य सदस्य उपस्थितीत होते. दरम्यान कोरपावली गावास लागुन असलेल्या महेलखेडी या गावातील नाराज ग्रामस्थांची ग्रामसभेला अनुउस्थितीत राहीलेत. ग्रामपंचायतीची ऑफलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तथापी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये नवीन आर्थिक वर्षाची ग्रामसभा घेण्यात येते.

मात्र या सभेत गावातील जेष्ठ व सुज्ञ नागरिकांसह महिलानी देखील नाराजी दाखवून सभेस पाठ फिरवली तर या सभेसाठी केवळ गावातील तरुण मंडळीची उपस्थितीती दिसुन येत होती तरी असे असतांना आजची ग्रामसभा सदस्यांच्याच कोरम अभावी ग्रामस्थ नसल्याने ही ग्रामसभा ही तहकूब करून आजची तहकूब सभा सात तारखेला घेण्यात येणार असल्याचे महेलखेडीचे ग्रामसेवक देवानंद सोनवणे यांनी जाहीर केले.

सरपंच शरिफा तडवी उपसरपंच माया महाजन व अन्य ग्रामपंचायत सदस्य त्याच बरोबर प्रमोद महाजन, समीर तडवी, युनूस तडवी, राजू तडवी, आशिष झुरकाळे, संदीप न्हावकर, कुंदन महाजन,फत्तु पटेल, प्रभाकर महाजन, रशीद पटेल, जावेद तडवी चंदू जवरे, राजू सुधाकर पाटील यांच्यासह नागरिकांची उपस्थिती दिसुन येत होती.

 

 

Protected Content