बेळगाव तो झांकी है…मुंबई अभी बाकी है : चंद्रकांत पाटलांनी डिवचलं !

पुणे प्रतिनिधी | बेळगाव महापालिकेतील यशावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना डिवचत आता मुंबई महापालिकेतही विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे.

याबाबत वृत्त असे की, सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव महापालिकेत  भाजपनं बहुमत मिळवलं, तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. बेळगावमध्ये भाजपने मराठी माणसाचा पराभव केल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या वेळी एखाद्या निवडणुकीच्या निकाल त्यांच्या बाजुने असतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्या वेळी निकाल त्यांच्या विरोधात लागतो तेव्हा ईव्हीएममध्ये त्यांना घोटाळा वाटतो. हे त्यांच्या स्वभावानुसारच असल्याचा खोचक टोला त्यांनी मारला

हैदराबादच्या वेळेलाही आम्ही एक-दोन नगरसेवकावरुन थेट ५१ वर गेलो. त्याच पद्धतीने आम्ही मुंबई लढणार, असं आव्हान पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तर बेळगाव तो झांकी है…मुंबई अभी बाकी है…हा ट्रेंड प्रत्यक्षात उतरणार असल्याचा दावा देखील त्यांनी याप्रसंगी केला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!