एमआयडीसी हद्दतून दुचाकीची चोरी करणारे तीन चोरटे अटकेत

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे दुचाकी चोरीचे दाखल गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गुन्ह्यातील चोरीच्या दोन दुचाक्या हस्तगत केल्या आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

स्लीम शेख शब्बीर उर्फ तस्या (28, मदिना कॉलनी, रावेर) व शंकर ज्ञानदेव दहिकार (40, टुणकी, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा) आणि मिलींद पुंडलिक जोशी रा. वाघ नगर जळगाव अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसीत पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेला संशयित आरोपी तस्लीम शेख शब्बीर उर्फ तस्या रा. मदीना कॉलनी रावेर जि.जळगाव याने चोरी केलेली (एमएच १९ बीआर २६६९) क्रमांकाची दुचाकी  शंकर ज्ञानदेव दहीकार (वय-४०) रा. टुणकी ता. संग्रामपूर जि.बुलढाणा याला विक्री केल्याच निष्पन्न झाले. त्यानुसार संशयित आरोपी शंकर दहीकार याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. 

 

तर दुसऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी मुकूंदा डिगंबर सुरवाडे रा. विवेकानंद नगर भुसावळ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे. त्याने भुसावळ शहरातील आठवडे बाजारातून मनोहर मधुकर ठाकूर रा. वांजोळा रोड भुसावळ यांची  (एमएच १९ बीडी २९८३) क्रमांकाची दुचाकी दोन वर्षापुर्वी चोरी केल्याचे कबुल करून ही दुचाकी मिलींद पुंडलिक जोशी रा. वाघ नगर जळगाव याला विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील दुचाकी एमआयडीसी पोलीसांनी हस्तगत करण्यात आली आहे.

या दोन्ही कारवाया एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोहेकॉ रमेश चौधरी, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे, योगेश बारी यांनी कारवाई केली. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!