चोपडा शहरात भाजपची आढावा बैठक

चोपडा प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी चोपडा शहरासह ग्रामीण बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांची आढावा बैठक खासदार रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.३१ ऑगस्ट) रोजी पार पडली.

बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख आढावा बैठकीमध्ये खा.रक्षाताई खडसे यांनी सर्व उपस्थित बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांना त्यांच्या स्फुर्तीदार भाषणातुन येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी प्रोत्साहित करून सशक्तीकरणाचे धडे दिले. आयुष्यमान भारत या योजनेतुन गोरगरिबांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी योजना समाजामध्ये तळागाळा पर्यंत आपल्या माध्यमातून पोहचावी या संदर्भात मार्गदर्शन केले.

तसेच कालच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमधे झालेल्या विविध मुद्यावरील चर्चेचा आढावा थोडक्यात सदर बैठकीत मांडला असता शेती विजजोडणी, केळी पीक विमा, ग्रामपंचायत वॉटर सप्लाय तोडणी संर्भात झालेल्या निर्णयांचा आढावा दिला. यावेळी बैठकीचे अवचित साधून चोपडा तालुक्यातील अनेक तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खासदार रक्षाताई खडसे व आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तसेच विविध नवनियुक्त भाजपा आघाडी अध्यक्षांना नियुक्ती पत्रक व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

तसेच मागील महिन्यामध्ये वर्डी गांवात झालेल्या विमान दुर्घटनेतील महिला चालकाचे प्राण वाचवण्यासाठी देवदूत म्हणून आलेल्या सौ.विमालबाई भिल्ल यांचे सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  परदेशात (जर्मनी) येथे आयोजित आयर्न मॅन स्पर्धेमध्ये चोपडा येथील मूळ रहिवाशी असलेल्या डॉ.देविका पाटील यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या आजोबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर बैठकीला खासदार रक्षाताई खडसे व आमदार राजूमामा भोळे यांच्यासह जि.प.अधक्ष्या रंजनताई पाटील, उपाध्यक्ष प्रल्हादभाऊ पाटील, नंदुभाऊ महाजन, राकेश पाटील, चोपडा तालुका पालक नेते महेश पाटील (अमळनेर), ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, सभापती आत्माराम म्हाळके, जि.प. महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पाटील, जि.प.कृषी सभापती उज्वलाताई म्हाळके, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, चोपडा तालुका विस्तारक प्रदीप पाटील, चोपडा पं.स.सभापती प्रतिभाताई पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैस्वाल, राज्य परिषद सदस्य अनिल पाटील, ज्येष्ठ नेते जी. टी. पाटील सर, चंद्रशेखर पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष ज्योत्स्नाताई चौधरी, जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे, महिला मोर्चा शहराध्यक्ष आरतीताई माळी, चोपडा कृ.उ.बाजार समिती संचालक धनंजय पाटील, रवींद्र पाटील, जिल्हा अ.ज. अध्यक्ष मगन बाविस्कर सर, सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिम्मतराव पाटील, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, हनुमत महाजन, भाजयुमो तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content