जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखती (व्हिडिओ)

 जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ३५ प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. यानुसार आज विद्यानिकेतन शाळेमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखती घेण्यात आल्यात. 

 

जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी शिक्षक दिनाच्या अनुषंगाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे १५  शिक्षकांना गौरविण्यात येते.  गतवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शिक्षक पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे मागील वर्षांचेही पुरस्कार यंदा संबंधित निवड झालेल्या शिक्षकांना दिली जाणार आहेत. तसेच शिक्षकांनी केलेल्या विविध कामांची दखल घेवून त्यांची मुलाखत घेण्यात आल्याची माहिती जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली.  आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, शिक्षण समिती सभापती रवींद्र पाटील, समाज कल्याण समिती सभापती जयपाल बोदडे,  प्राथमिक शिक्षण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी  मुलाखती घेतल्या.

तालुकानिहाय जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले प्रस्ताव :   जळगाव -३,  एरंडोल-२, धरणगाव-३, जामनेर-३, मुक्ताईनगर-३, रावेर-२, यावल-२, बोदवड-३, चोपडा-२, पाचोरा-१, पारोळा-१, अमळनेर-१, भडगाव-२, भुसावळ-३, चाळीसगाव-३.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/545000960079260

Protected Content