जळगावात दहशतवादविरोधी मोर्चाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देश्यीय संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने २२ रोजी जळगावात दहशतवादविरोधी मोर्चा काढण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पुढाकाराने शहरातून हा मोर्चा निघणार असून त्यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.
श्री.सोनावणे म्हणाले की, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता हा मोर्चा चौबे शाळेपासून सुरू होणार आहे. यानंतर घाणेकर चौक,टॉवर चौक, नेहरू चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, कोर्ट चौक,स्टेडियम चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकापासून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार आहे. येथे विविध वक्ते मनोगत व्यक्त करतील. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. तर पुलवामा येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील मलकापूर जि.बुलढाणा येथील संजय राजपूत तसेच गोवर्धननगर, लोणार,जि.बुलढाणा येथील नितीन राठोड हे जवान शहीद झाले आहेत. या शहीद जवानांच्या कुटूंबियांसाठी सहवेदना निधी संकलनासाठी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हा बँकेत विशेष खाते सुरू करण्यात येणार असून निधी देवू इच्छिणार्‍यांकडून त्याच खात्याच्या नावाने धनादेश स्वरूपात निधी स्वीकारला जाणार असल्याची माहिती कैलास सोनवणे यांनी दिली.

Add Comment

Protected Content