Home Cities जळगाव टायगर ग्रुप जामनेरतर्फे गोरगरिबांना अन्नदान

टायगर ग्रुप जामनेरतर्फे गोरगरिबांना अन्नदान

0
129


जळगाव, प्रतिनिधी । टायगर ग्रुप चे सदस्य मिलिंद परसोडे यांना कन्या रत्न प्राप्त झाल्याबद्दल तालुक्यातील जामनेर येथील जिल्हा रुग्णालय येथे आज ८ रोजी टायगर ग्रुपतर्फे गोर गरिबांना अन्नदान व चहा वाटप करण्यात आले.

आज ८ जून रोजी टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पै. तानाजी जाधव, टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्राचे पै. सागर कांबळे व टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष पै. ऋषीकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद परसोडे यांना कन्या रत्न प्राप्त झाल्याबद्दल टायगर ग्रुप जामनेरतर्फे जिल्हा रुग्णालय येथे गरजूंना अन्नदान व चहा वाटप करण्यात आले. टायगर ग्रुप जामनेर प्रमुख सदस्य आकाश चौधरी, आदित्य परसोडे, मोहित माळी, कल्पेश चौधरी, अजय झाल्टे, महेश तेली, दिपक तायड़े, तुषार पाटील, जीवन माली, गौरव तेली, आशीष माली, लोकेश मोरे , मनोज पवार, कुणाल सोनार, तेजस वाणी, साहिल सैतवाल, स्वप्निल मोरे, ईश्वर माली आदि उपस्थित होते


Protected Content

Play sound