
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील गुजराथी गल्ली येथील रहिवासी तथा माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलदास गोवर्धनदास गुजराथी (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गुजराथी कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

विठ्ठलदास गोवर्धनदास गुजराथी यांचे २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
विठ्ठलदास गुजराथी हे माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी आणि वसंत काका गुजराथी यांचे मोठे बंधू होते. तसेच ते उद्योजक प्रदीपभाई विठ्ठलदास गुजराथी यांचे वडील होते. सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात त्यांचा मोठा परिचय होता.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, एक मुलगा, दोन मुली, जावई, भाऊजाई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गुजराथी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
विठ्ठलदास गुजराथी यांच्या निधनाने चोपडा शहरातील गुजराथी कुटुंबीय व परिचितांनी हळहळ व्यक्त केली असून त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.



