Home Cities अमळनेर जिल्हा बँकेच्या ठरावासाठी मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड

जिल्हा बँकेच्या ठरावासाठी मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड

0
7


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या जिल्हा बँक प्रतिनिधी पदाचा ठराव सभासद मधुकर यशवंत पाटील यांच्या नावाने बिनविरोध करण्यात आला. त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल गावासह परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

मधुकर पाटील हे पत्रकार बाबुलाल यशवंत पाटील यांचे मोठे बंधू आहेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेशी संबंधित प्रतिनिधित्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याने सोसायटीच्या सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी माजी शेतकी संचालक व संचालक पिंटू राजपूत, चेअरमन जयदीप प्रकाश पाटील, माजी चेअरमन व संचालक बाबुलाल यशवंत पाटील, रमेश चिंधा चौधरी, सुनील देवनाथ पाटील, माजी व्हाइस चेअरमन अशोक हिलाल चौधरी, नरेंद्रसिंग गुलाबसिंग पाटील, संचालक दीपचंद ईंदरचंद छाजेड, जगन्नाथ रामदास चौधरी, संचालिका शोभाबाई कौतिक महाजन, मंगलाबाई दत्तात्रय बडगुजर आणि सचिव सुधाकर मुलचंद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मधुकर पाटील यांच्या बिनविरोध निवडीबद्दल मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील, माजी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे, एल.टी. पाटील, नगरसेविका जयश्रीताई पाटील आणि मुरलीधर महाजन यांच्यासह गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले.

जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी पदासाठी झालेली ही बिनविरोध निवड सहकार क्षेत्रातील एकमताचे आणि परस्पर सहकार्याचे उदाहरण मानली जात आहे. मधुकर पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

कळमसरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून मधुकर यशवंत पाटील यांची जिल्हा बँकेच्या प्रतिनिधीपदासाठी बिनविरोध निवड झाल्याने गावासह अमळनेर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 


Protected Content

Play sound