मालोद येथे घराची भिंत कोसळुन चार वर्षीय बालकाचा मृत्यू

 

यावल : प्रतिनिधी । मालोद येथे पावसात घराची भिंत  कोसळून ४ वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .

 

यावल तालुक्यातील मालोद या आदीवासी गावात आज सकाळी  ईमाम दगडु तडवी यांच्या घराची  मातीची भिंत पाऊसामुळे  कोसळली  घरात खेळत  असलेला ४ वर्षाच्या आबीद इमाम तडवीच्या अंगावर भिंत कोसळल्याने  तो जागीच मरण पावला  गावातील नागरीकांच्या मदतीने कोसळलेल्या भिंतीच्या ढीगाऱ्यातुन त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला  मालोद गावावर  शोककळा पसरली आहे

 

या चार वर्षीय बालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन  यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके यांनी केले . मयत बालकाचे वडील इमाम दगडु तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे  करीत आहे . मालोद येथील तलाठी तेमरसिंग बारेला यांनी तात्काळ घटनास्थळी  जावुन पंचनामा केला

 

Protected Content