फारूक शेख राज्य शासनाच्या विशेष पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2019 09 08 at 3.09.18 PM

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा मानियार बिरदारीचे अध्यक्ष व जैन स्पोर्ट्स अकादमीचे क्रीडा समनव्यक फारूक शेख अब्दुल्ला यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्यीक अकादमी,अल्पसंख्याक विकास विभागाचा २०१७ चा विशेष पुरस्कार देऊन राज्य मंत्री अतुल सावे व खासदार इम्तियाझ जलील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात मानियार बिरादरीच्या माध्यमातून सामूहिक विवाह, वैवाहिक वाद, जकातच्या माध्यमातून शैक्षणिक, वैद्यकीय,सामाजिक कार्य करून, उर्दू मुशायरा व उर्दू साहित्यिक कार्यक्रमाच्या आयोजनाची दखल घेत शासनाने त्यांना २०१७ चा पुरस्कार घोषित केला होता तो रविवारी औरंगाबाद येथील व्ही. आय. पी. फंक्शन हॉल येथे मेमोनटो,प्रमाणपत्र व १५ हजार रुपये रोख स्वरूपात त्यांना देण्यात आला. प्रमाणपत्रावर अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे, राज्य मंत्री अतुल सावे, प्रधान सचिव श्याम तांगडे व कार्याध्यक्ष डॉ. अहेमद सिद्दीकी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी महापौर नंदकुमार घोडोले, तसेच अल्प संख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, अकादमी चेअरमन डॉ. अहेमद राणा, हज कमेटीचे एजाज देशमुख, व अकॅडमीचे असलम तन्वीर व रफिक अहेमद यांच्या उपस्थित देण्यात आला.  महाराष्ट्रातील १२२ व्यक्तींना २०१७ व २०१८ या दोन वर्षासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शेख यांची शासकीय पुरस्काराची हॅट्ट्रिक

फारूक शेख यांना यापूर्वी क्रीडा क्षेत्रातील शासनाचा २०१५ चा क्रीडा मार्गदर्शक व २०१६ चा क्रीडा संघटक हे पुरस्कार मिळाले आहे. २०१७ चा शासनाचा हा तिसरा पुरस्कार त्यांनाअल्प संख्याक उर्दू विभागातर्फे विशेष पुरस्कार म्हणून मिळाला असल्याने त्यांची शासकीय पुरस्काराची हॅट्ट्रिक झालेली आहे. शेख यांना शासनाव्यतिरिक्त इतर संघटनातर्फे आतापर्यंत २१ पुरस्कार प्राप्त झाले आहे. शेख यांना हा पुरस्कार मिळाला त्यावेळेस जळगाव जिल्ह्यातील मानियार बिरारदारीच्या कार्यकर्त्यासह मुंबई व धुळे येथील कार्यकर्ते त्यात प्रामुख्याने मुंबईचे रफिक शेख, मुश्ताक शेख, धुळेचे आरिफ शेख, भुसावळचे नगरसेवक इम्तियाज शेख, जळगावचे सलीम शेख, सलीम मानियार, तय्यब शेख ,रउफ टेलर, ताहेर शेख, अल्ताफ शेख, उमर कासीम, समीर शेख, नूर शेख, नाशिराबादचे इस्माईल शेख, वसीम शेख यांची उपस्थिती होती. शेख यांच्या यशाबद्दल जैन इररिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महावीर बँक चे दलीचंद जैन, उर्दू अकादमीचे असलम तन्वीर, जमियतचे मुफ्ती अतिकुर रहेमान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष(अल्पसंख्याक) गफ्फार मलिक, इकराचे करीम सालार, एम आय एम चे बशीर बुऱ्हानी, झिया बागवान, रय्यान जहागीरदार, काँग्रेसचे रईस शेख, समाजवादीचे नईम लकडावाला, शिवसेनेचे रईस शेख, मनसेचे जमील देशपांडे, मेमन जमातचे इंद्रिस हिंगोना, बोहरा समाजचे युसूफ बोहरा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, आयशा खान व कांचन चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभा बडगुजर, बेंडाळे कॉलेजच्या प्रा. डॉ. अनिता कोल्हे, फुटबॉल असोचे जफर शेख व अब्दुल मोहसीन, हॉकी असोसियनचे सुरेखा रडे व लियाकत अली, बुद्धीबळ संघटनेच्या अंजली कुलकर्णी, जलतरणच्या रेवती नगरकर, आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे, कॅरम असो.चे सैयद मोहसीन, क्रिकेटचे शेखर देशमुख, भाजपच्या डॉ. अस्मिता पाटील, साहस फाउंडेशनच्या सरिता माळी, आयएमआर कॉलेज च्या प्रा. डॉ. शमा सराफ, धरणगाव कॉलेजच्या प्रा. डॉ. छाया सुखदाने, बँक ऑफ बरोडाच्या विनया जोशी, नवी पेठ महिला मंडळाच्या राजी नायर व विजया पांडे,महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे तसेच ईदगाह ट्रस्टचे सर्व सन्मानीय सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content