जळगावात दुचाकी चोरीप्रकरणी एकास अटक

shani pethe

प्रतिनिधी प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात शनीपेठ पोलीसांना यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की, ७ सप्टेबर रोजी समीर जैन यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ एए १००८) चोरीस गेली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हे शोध पथकाचे दिनेशसिंग पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन हकीम शेख, संजय शेलार, परीस जाधव, नीतीन बाविस्कर, अनिल कांबळे, राहुल पाटील, किरण वानखेडे यांच्या पथकाने शनिवारी भंगार बाजाराजवळुन राहुल सुरेश आरखे (वय २३, रा.पिंप्राळा हुडको) याला संशयावरुन ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जैन यांची दुचाकी त्याने राहत्या घरात लपवून ठेवली होती. ही दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. राहुल याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी कळविले आहे. पुढील तपास पोहेका परीस जाधव, मनोज येऊलकर, राहुल घेटे करीत आहेत

Protected Content