फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गणेश उत्सवाचे औचित्य साधून एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांच्या संकल्पनेतून केळीच्या सुकलेल्या खोडाच्या पानांपासून पर्यावरण पुरक नैसर्गिक सुंदर आरस तयार करण्यात आली असून गणपती सुद्धा पर्यावरण पूरक केलेला आहे.
त्याचे रंगकाम स्वतः तयार करण्यात आलेले आहे. मूर्ती हत्तीवर आरूढ झालेली असून मुख हत्तीचे दाखवण्यात आले आहेत. साळींनी बोलताना सांगितले की, केळीच्या सुकलेल्या पत्ती पासून पर्स, हँड बॅग, पॉट, किचन, पेन बॉक्स बॅग, पॉट अशा विविध शोभिवंत वस्तू बनवल्या जाऊ शकतात. आरस खूपच सुंदर असून कलात्मक रोषणाई करण्यात आली आहे. सदर आरस बघण्यासाठी गर्दी होत आहे, राजू साळी यांच्या कडे विविध क्षेत्रातील लोकांना आरती साठी आमंत्रित केले जाते. आरस बघून राजू साळींचे कौतुक होत आहे. गणपती किंवा गणेश म्हणजे गणांचा स्वामी गण म्हणजे समुदाय किंवा जमाती ब्राह्मणस्पती हे ऋग्वेदात ‘गणपती’ असे विशेषण आहे आणि तो हिंदू धर्मातील बुद्धीचा पहिला शासक आणि विघ्न नियंत्रक मानला जाणारा देव आहे आणि गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते आणि महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.