यावल शहरातील बेवारस वाहने ताब्यात घ्या; रिपाइंची मागणी

यावल प्रतिनिधी । शहरातील श्रीरामनगर प्रवेशद्वारासमोरील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बेवारस अवस्थेत उभ्या असलेल्या चारचाकी वाहन पोलीसांनी ताब्यात घ्यावे व संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा पोलीस स्टेशनसमोर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा रिपाइं (अ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील सातोद कोळवद मार्गावर असलेल्या श्रीराम नगर वसाहतीच्या प्रवेशद्वारा समोर गेल्या चारचाकी वाहन (एमएच १९,बीजे ५०२),(एमएच१९ बिएम ३९३५), (एमएच १९ सीवाय २१३५) आणि (एमएच १९ बिएम २७४४) ही वाहने शहरात बेवारसप्रमाणे पडून आहेत. वाहने संशयीत असून सर्व गाडया कुणी चोरून लावल्या आहेत का ? किंवा गाडयांचे नंबर प्लेट बदलुन घातपात करण्यासाठी आणल्या आहे का ? किंवा कुणी सावकारे जोर जब्बरदस्तीने उच्चलुन आणल्या आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या श्रीराम नगर प्रवेशद्वारा पासून यावलचे पोलीस स्टेशन १०० मिटरच्या अंतरावर असून तरी पोलीस निरिक्षक दुर्लक्ष करीत आहे. याचे कारण असे की, शहरातील युवराज घारू व त्याचा भावांनी सावकारीच्या व्यवहारातुन या गाडया लोकांकड्डन हिसकावुन आणलेल्या आहे. हा सर्व प्रकार पोलीस निरिक्षकांच्या आशिर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे. सदरची घारू मंडळीही पोलीसांच्या नावाने नागरीकांना धमकावतात व कुणी तक्रार करण्यास आल्यास क्रॉस तक्रारीच्या नावाखाली तक्रादारावर दबाव आणून तक्रार नोंदवण्यास भाग पाडतात. त्यामुळे लोक तक्रार देण्यास जात नाही. पोलीस निरिक्षक यांच्या आशिर्वादाने शहरात धारूबंधु सावकारी व दादागिरी करीत असुन यांच्याविरुद्ध तक्रारीचे निवेदन आहे. वर दिलेल्या सर्व गाडया पोलीसांनी ताब्यात घेवून वाहनांच्या मुळ मालकास बोलवून कायदेशीररित्या परत करावी व दोशींवर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास २० जुलैपासून यावलच्या पोलीस स्टेशनसमोर रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या माध्यमातून जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यासंदर्भात तहसीलदार जितेंद्र कुवर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष अरूण गजरे, भिमराव गजरे, विष्णु पारधे, सागर गजरे, पप्पू पटेल, नितिन बोरेकर आदींच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content