Home Cities अमळनेर महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

0
59

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गंगापुरी गावात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. सध्या ती महाविद्यालयाचे शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे गुरुवार १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता तरुणीही गावानजीकच्या गंगापुरी बसस्थानक येथे अमळनेर येथे जाण्यासाठी आली होती. त्यावेळी गंगापुरी गावात राहणारा संशयित आरोपी वीरेंद्र राजेंद्र पाटील याने तरुणीचा पाठलाग केला, तसेच माझ्यासोबत मैत्री कर असे सांगून तिला धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर तरुणीने सायंकाळी सहा वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी वीरेंद्र राजेंद्र पाटील यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound