लोकसभा निवडणूकीसाठी एरंडोल-पारोळा तालुका प्रशासन सज्ज !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभेच्या पार्श्वभूमीवर एरंडोल विधानसभा मतदार संघातील एकुण २९० मतदान केंद्रावर १३ मे रोजी होऊ घालतेल्या निवडणूकीकरीता निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्णत्वाकडे झाली आहे. मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवा, शासनस्तरावर अथक प्रयत्न सुरू असल्याचे महसूल उपविभागीय अधिकारी एरंडोल तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी जळगाव लोकसभा मतदारसंघ मनीष कुमार गायकवाड यांनी दिली. पारोळा तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे नायब तहसीलदार रवींद्र महाडिक हे उपस्थित होते.

पारोळा तालुक्यात २४६ दिव्यांग मतदार असून त्यापैकी १० मतदार हे बेड रिडण वर आहेत त्यामुळे त्यांचे पोस्टाने मतदान करून घ्यायचे आहे. पारोळा शहरात बुध क्रमांक १०६ साने गुरुजी शाळा येथे फक्त दिव्यांग मतदान केंद्र आहे. दिव्यांगांना आपलेसे वाटावे म्हणून येथील बुध अधिकारी कर्मचारी हे दिव्यांगच असतील. तसेच बूथ क्रमांक ९६ हा बालाजी शाळेतील मतदार केंद्रावर महिला मतदार केंद्र म्हणून आयोजन केलेले आहे. तेथे ८३६ मतदार मतदान करू शकतील. याकरिता येथील अधिकारी व कर्मचारी या महिलाच आहेत. देशाच्या भवितव्यासाठी मतदान करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगण्यासाठी शासन स्तरावरून पथनाट्य सभा ग्रामसभा कर्मचाऱ्यांच्या बैठका व्यापारी व संघटनांच्या बैठका या घेण्यात येत आहेत जनजागृती करिता आपले नाव मतदार यादीत आहे ठिकाणी बाजाराचे व यात्रेच्या ठिकाणी केली जात आहे.

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात शासन स्तरावरून रिक्षा फिरवून मतदान शंभर टक्के व्हावे अशा आशयाची माहिती जनतेत पोहोचली जाईल.८५ प्लस वयोगटातील एकूण मतदार १५६६ त्यापैकी ४८ मतदार हे बेडरिडन आहेत. त्यांची विशेष व्यवस्था करावी लागणार आहे. सर्व केंद्रप्रमुखांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.पारोळा तालुक्यात १२३ मतदान केंद्राकरीता ३४८ ईव्हीएम मशीन मिळालेले आहेत. शासन स्तरावरून मतदान प्रक्रियेसाठी जय्यत तयारी झाली असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनतेतून देखील प्रबोधन व जनजागृती व्हावी असेही शेवटी मनीष कुमार गायकवाड यांनी आवाहन करून सांगितले.

Protected Content