आझाद हे बिन काट्यांचे गुलाब ! : राऊतांचे कौतुकोदगार

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राजकीय विरोधाला वैयक्तीक संबंधाच्या आड येऊ न देणारे गुलाम नबी आझाद हे बिन काट्यांचे गुलाब असल्याची वाखाणणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. राज्यसभेत आज आझाद यांना निरोप देतांना राऊत बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद gulam nabi azad आज राज्यसभेतून निवृत्त झाले. यानिमित्त पंतप्रधानांसह मान्यवर नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत sanjay raut यांचे भाषण लक्षणीय ठरले. ते म्हणाले की, ”गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब आहे. ज्यांच्यासोबत काम केलं. ती व्यक्ती आज सभागृहातून जात आहे. मला विश्वास आहे की, ते पुन्हा सभागृहात परत येतील. त्यांनी इंदिरा गांधीपासून ते मोदीजींपर्यंतचा काळ बघितला. त्यांनी इंदिरा गांधी ते मोदी असं पुस्तक लिहायला हवं. जेव्हा दिल्लीच्या राजकारणात मोठंमोठी माणसं होती. तेव्हा आझादांसारखी एक व्यक्ती गावातून येते आणि यशस्वी झाले,” असं राऊत म्हणाले.

“त्यांचं महाराष्ट्रासोबत त्यांचं फार जुनं नातं आहे. जसं की शरद पवारांनी सांगितलं की, त्यांनी वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. निवडून आले होते. त्यामुळे तिथे आजही त्यांच्याविषयी बोललं जातं. ते मराठीतून बोलतात. मोदी जसं मराठीतून बोलतात.. तसं आझादही बोलतात. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही. पण, संपूर्ण देश जाणतो, असे आझादांसारखे नेते खूप कमी आहेत. मी आझाद यांना निरोप देत नाही. ते परत सभागृहात येईपर्यंत मी त्यांची वाट बघेन,’ अशा भावना राऊत यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Protected Content