Home क्राईम शेतातून बैलगाडी नेल्याच्या जाब विचारल्यावरून तरूणाला बेदम मारहाण

शेतातून बैलगाडी नेल्याच्या जाब विचारल्यावरून तरूणाला बेदम मारहाण

0
118


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वंजारी बुद्रुक शेत शिवारातील शेतातून गेलेल्या रस्त्यावरून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला पाच जणांनी लाकडी काठीने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना गुरूवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुलाब साहेबराव पाटील वय-४० हे आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील वंजारी बुद्रुक गावात वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता प्रमोद एकनाथ चौधरी हा त्याची बैलगाडी गुलाब पाटील यांच्या वंजारी बुद्रुक शिवारातील शेतातून घेवून गेला. त्यावर गुलाब पाटील याने शेतात बैलगाडी घेवून जावू नका असे सांगितले. याचा राग आल्याने प्रमोद एकनाथ चौधरी, एकनाथ दयाराम चौधरी, मंगलाबाई एकनाथ चौधरी, राजेंद्र एकनाथ चौधरी आणि प्रमोदची पत्नी या पाच जणानी गुलाब पाटील याला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुलाब पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता प्रमोद एकनाथ चौधरी, एकनाथ दयाराम चौधरी, मंगलाबाई एकनाथ चौधरी, राजेंद्र एकनाथ चौधरी आणि प्रमोदची पत्नी सर्व रा. वंजारी बुद्रुक ता. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound