ठाकरे गट युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन यांची नियुक्ती

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथे आयोजित करण्यात आलेला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकारी यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना वाढविण्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी पक्ष संघटनेसाठी आहोरत्र झटत असणारे विनोद रोकडे यांची युवासेना जिल्हा संघटकपदी तर युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत काशिनाथ महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुखपदी सतीश बोरसे, रणजित सिकरवार सोपान महाजन तर कार्यालय प्रमुख पदी गोपाल पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, करण पवार, युवासेना जिल्हा प्रमुख व लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, तालुका प्रमुख जयदीप पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी, माजी नगरसेवक जितेंद्र धनगर, किरण मराठे, युवासेना शहरप्रमुख परमेश्वर महाजन, लक्ष्मण महाजन यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन यांनी स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीची आठवण करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी जात पात न पाहता युवा वर्गाला संधी देण्याचे तेच विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत, पक्षांनी दिलेले जबादारी योग्य प्रकारे पार पडेल, असे पत्रकार शी बोलताना व्यक्त केले.

Protected Content