भीषण अपघातात दुचाकीस्वारासह परप्रांतीयाचा मृत्यूप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या पुष्पा पेट्रोलपंपाजवळ भरधाव दुचाकीने पायी जाणाऱ्याला जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या परप्रांतीयासह दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती गुरूवार १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात राहणारा प्रणव प्रशांत कुदळे वय २२ हा तरूण ३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्याचे काका राहूल वसंत कुदळे यांना रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीडब्ल्यू ४६६७) ने गेला होता. काका राहूल कुदळे यांना रेल्वेस्टेशन जवळ सोडून परत घराकडे परतत असतांना ४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास पुष्पा पेट्रोलपंपाजवळ रोडवरून जात असतांना त्याने पायी जाणाऱ्या परप्रांतीय धमेंद्र राधेश्यामसिंग वय ४२ रा.केराकत उत्तरप्रदेश ह.मु. पोलीस कॉलनी, जळगाव यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रणव कुदळे आणि पायी जाणारा परप्रांतीय धमेंद्र राधेश्यामसिंह हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर गुरूवार १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील हे करीत आहे.

Protected Content