मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर यांनी संप पुकारला होता. त्यानंतर पुन्हा कामावर हजर झाल्या. परंतू मुक्ताईनगर तालुक्यातील आशा वर्कर यांची गट प्रवर्तक यांच्याकडून पिळवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
आशा वर्कर यांनी संपा आधीची उर्वरित कामे पुर्ण करून मिटींगच्या दिवशी त्यांनी हजर केली. परंतू गटप्रवर्तक यांनी मीटिंगच्या दिवशी आशा वर्कर यांची कामाची कागदपत्रे घेतलीच नाही. आशा वर्कर यांना जीपीएस फोटो काढण्याचा जीआर नसून हे गटप्रवर्तकांनी जीपीएसचे फोटो स्वतः आशा वर्कर सोबत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरून त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सक्ती आहे. परंतु आशा वर्कर यांना गटप्रवर्तकांकडून जीपीएस फोटोची सक्ती केली जात आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व अशा हलगर्जी करणाऱ्या गटप्रवर्तकाकडे लक्ष देऊन कामाचे गांभीर्य लक्षात घेता योग्य ती कारवाई करून आशा वर्कर यांना न्याय द्यावा. अशी अपेक्षा मुक्ताईनगर तालुक्यातील आशा वर्कर ही करत आहे. अशा वर्कर ही ग्राउंड लेव्हलला काम करत असते, आशा वर्कर ही प्रत्येक घराच्या चुलीपर्यंत पोहोचण्याचे काम अशा वर्कर करत असते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आशा वर्कर यांची दखल घेऊन कारवाई करावी अशी आशा वर्कर यांचे अपेक्षा आहे.
मुक्ताईनगर येथील आशा वर्कर यांच्या बीसीएम मॅडम यांना या घटनेबाबत चौकशी करता कॉल केला असता कॉल उचलण्यात असमर्थ असल्याचे दिसून आले. तर जिल्हा पातळीवर संपर्क साधला असता श्री जगताप यांनी सांगितले की, जीपीएस फोटो हा फक्त गटप्रवर्तकांना आशा वर्कर सोबत काम करताना सक्तीचा आहे. याबाबत आशा वर्कर यांना जीपीएस फोटो काढण्याची कुठलीही सक्ती नसल्याचे सांगितले आहे.