मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात गुटखा, सुगंधित पानमसाल्याची सर्रास विक्री

पोलीसांसह अन्न व औषध प्रशासनाचा काळाडोळा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज । मुक्ताईनगर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि पानमसाल्याची सर्रासपणे विक्री केली जात आहे. याकडे पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन साफ दुर्लक्ष केले जात आहे. काही महिन्यांपुर्वी गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यावर कारवाईच्या संख्या वाढल्या होत्या. परंतू सध्या रात्र आणि दिवसाच्या सुमारास अवैधरित्या गुटखाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे.

मुक्ताईनगर शहराला विशिष्ट राज्याच्या सीमा लागलेल्या असून या सीमे लगतच मध्यप्रदेशची सीमा लागून आहे. मध्यप्रदेशांमध्ये गुटखा हा मोठ्या प्रमाणात चालत असून याची प्रशासनामार्फत विक्रीसाठी कुठलीही बंदी नसून हा गुटखा बऱ्हाणपूर शहरासह शहापूर येथून राज्यात मुक्ताईनगर मार्गे दाखल होतोय. आणि इथूनच या गुटखाची माहतूक करून औरंगाबाद आणि नंदुरबार जिल्ह्यात विक्री केला जातो. मध्यप्रदेशातून हा गुटखा महाराष्ट्रात दाखल होत असतांना महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश चेकपोस्ट जवळ प्रत्येक वाहनांची चेकींग केली जाते. असे असतांन गुटख्याने भरलेले वाहन महाराष्ट्रात कसे दाखल होता असा प्रश्न नागरीकांमध्ये केला जात आहे.

या वाहनांची महाराष्ट्र चेक पोस्टवर तपासणी होत नाही का होत असेल तर ही वाहने महाराष्ट्र चेक पोस्ट वरून तपासणी आरटीओ अधिकारी कसे काय सोडतात की यांना पैसे देऊन डायरेक्ट सोडले जात असते जर यांना डायरेक्ट सोडले जात असेल तर नेमका तो आरटीओ अधिकारी कोण व महाराष्ट्र चेक पोस्ट वरून जरी असे अवैधरित्याचे वाहने सोडले जात असतील तर मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन करते तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.

चेक पोस्टवरील आरटीओ तसेच मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासन यांचा तिघांचा साटेलोटेचा प्रकार असल्याशिवाय व मुक्ताईनगर शहरातून अवैध गुटख्यांची किंवा अवैध कुठल्याही प्रकारची गाडी पासच होऊ शकत नाही. यावर मुक्ताईनगरवासियांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नेमका तो अधिकारी कोण, पूर्णाड फाट्यावर देखील बऱ्याच वेळा बंदोबस्त पोलीस प्रशासनाचा असतो, परंतु कुठलेच वाहन तपासले जात नाही का !

मुक्ताईनगर शहराला पोलीस निरीक्षकांच्या कारकिर्दीत बहुतांश वेळा अन्न व औषध प्रशासनाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून अवैध रित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाया केल्या जात होत्या. परंत पोलीस निरीक्षक मोहिते यांनी पदभार संभाळल्यापासून अवैधरित्या विमल गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई होतांना दिसून आले नाही. त्यामुळे अवैधरित्या मुक्ताईनगर शहरात आणि तालुक्यात बेसुमार गुटखाची मोठी विक्री केली जात आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी अधिवेशनामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अवैध गुटखा यावर आवाज उठवला होता. व त्याचबरोबर अवैध विमल गुटख्यांच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात पकडल्या गेल्या होत्या. आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील अवैध गुटख्यांची गाडी येत असल्याची माहिती मिळताच स्वतः मध्य प्रदेशातून येत असलेले वाहन पुर्णाड फाट्यावर नवीनच बुलेरो पिकअप वाहन मुद्देमालासह पोलीसांच्या ताब्यात दिले होते. मात्र त्यानंतर मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाला नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी आज तागायत कुठलीही अवैध धंद्याबाबत कारवाई केलेली नाही.

मुक्ताईनगर शहरातील प्रत्येक गल्लीतील पानटपरीवर गुटखा आणि पानमसाला विक्री जोमाने होत आहे. मुख्य चौकामध्ये तिरंगा ध्वज देखील फडकत असतो त्या चौकाच्या हाकेच्या अंतरावर टपऱ्या उपलब्ध असून सहजरीत्या टपऱ्यावर हा गुटखा उपलब्ध होत आहे. ही आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होऊन कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत आहे. लहान चिमुकले मुले आणि महिला देखील याचे सेवन करताना आढळून येत आहे. या अवैध विमल गुटख्यावर मुक्ताई नगर येथील पोलीस प्रशासन कारवाई करणार का की असेच आर्थिक हितसंबंध जोपासून अवैध धंदा चालू राहणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

Protected Content