थोरगव्हाण येथे पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पोलीस कोठडी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून लाकडी दांडका मारून खून करणाऱ्या पतीविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अटकेतील संशयित आरोपी पतीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, थोरगव्हाण तालुका यावल येथे रविवारी २७ फेब्रुवारी रविवार रोजी गावात राहणारे प्रकाश पांडुरंग पाटील (वय-६३) वर्ष व त्यांची पत्नी इंदुबाई प्रकाश पाटील (वय-५९) यांच्या वाद होवुन संतापात प्रकाश पाटील यांनी आपल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्या गंभीर जख्मी झाल्या होत्या. इंदुबाई यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव घेवुन जात असतांना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी यावल पोलीसांनी संशयित आरोपी याला अटक केली आहे. मयत महिलेवर जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  दरम्यान या गुन्ह्यातील संयशीत आरोपी प्रकाश पाटील यांच्या विरूद्ध त्यांचा मुलगा आनंदा पाटील यांच्या फियादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्या.व्ही एस डामरे यांनी  ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ हे करीत आहे .

Protected Content