चाळीसगावातून अज्ञाताने लांबवली दुचाकी

चाळीसगाव, प्रतिनिधी  ।   घरा समोर उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना शहरातील लक्ष्मीनगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

याबाबत वृत्त असे की, योगेश प्रभाकर फासे (वय-४०) रा. लक्ष्मीनगर ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह ते करीत असतात. १६ जूलै रोजी शेतातील काम आटोपल्यानंतर फासे हे रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी आले. दरम्यान घरात जाण्यापूर्वी त्यांनी आपली दुचाकी (क्र. एम.एच.१९ एटी ९१०२) घरासमोर उभी करून रात्री १० वाजता झोपून गेले. फासे हे सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास उठल्यावर घराबाहेर आले असता त्यांना मोटारसायकल हि मुळ जागी दिसून आली नाही. त्यावर त्यांनी परिसरात, ठिकठिकाणी व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु, मोटारसायकल मिळून आली नाही म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने फासे यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content