दुरदर्शन केंद्रजवळील महामार्गावर दुचाकी घसरल्याने पित्याचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी | भुसावळहून जळगावला येत असतांना दुचाकी स्लीप झाल्याने  प्रकाश शामराव जोशी (वय-४६) रा. भुसावळ हे जागीच ठार झाले तर त्याची मुलगी अदिती ही गंभीर जखमी झाल्याची घटन आज रविवारी २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग खेडीजवळ घडली. जखमीला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, आज रविवार असल्यामुळे प्रकाश शामराव जोशी (वय-४६) रा. कोळी मंगल कार्यालयाजवळ रा. भुसावळ हे जळगावातील जळगाव जनता बँकेत कार्मीक विभागात नोकरीला आहे. बँकेच्या कामानिमित्त आणि जळगावातील पिंप्राळा येथील भाचा अतुल पाठक यांना भेट होईल या निमित्ताने ते कुटुंबियांसह जळगावला जाण्याचा बेत केला. यात त्याची पत्नी नूतन आणि रेवती आणि अकांक्षा असे तिघेजण भुसावळहून रेल्वेने निघाले आणि प्रकाश जोशी आणि त्यांची तीन नंबरची मुलगी आदिती हे दुचाकीने भुसावळहून जळगावला येण्यासाठी आज रविवार २५ जुलै रोजी सकाळी निघाले. जळगावात दाखल झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून येत असतांना खेडी गावाजवळ त्यांची दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात प्रकाश जोशी हे जागीच ठार झाले तर मुलगी आदिती जोशी (वय-१८) ही गंभीर जखमी झाले. जखमीस तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर मयत झालेले प्रकाश जोशी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. मयत प्रकाश जोशी यांच्या पश्चात पत्नी नूतन, आदिती, रेवती आणि अकांक्षा तीन मुली, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे आणि पोलीस नाईक नितीन पाटील करीत आहे.

 

Protected Content