एरंडोलचे जवान राहूल पाटील यांचे निधन .

 

एरंडोल : प्रतिनिधी । येथील शंकरनगर गांधीपूरा परिसरातील रहिवासी राहूल लहू पाटील ( वय ३० ) हे जवान पंजाब पाकिस्तान सिमेवर कर्तव्य बजावत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांचे निधन झाले . ही बातमी शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास धडकल्यावर . एरंडोल शहरावर शोककळा पसरली आहे

प़जाब मधील फजलखां येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये पाटील त्यांच्या परिवारासह वास्तव्यास होते . तेथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर भारत पाकिस्तानच्या सीमेवर राहुल पाटील हे कर्तव्य बजावत असताना त्यांचे निधन झाले .

या घटनेमुळे एरंडोल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नुकताच ४ फेब्रुवारीरोजी त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा केला होता व ५ फेब्रुवारीरोजी सकाळी साडेसातच्या सुमारास व्हिडिओ कॉल करून एरंडोल येथील त्यांच्या भावाशी व आईशी बोलताना सांगितले की पुढच्या महिन्यात मी माझ्या परिवारासह घरी येणार आहे यावेळी पाटील यांनी व्हिडिओवरून भाऊ व आईला कर्तव्य बजावत असलेल्या स्थळाचे चित्रही दाखविले. होते .
राहुल पाटील यांनी बी.ए पर्यंत शिक्षण घेतले त्यांचा एक भाऊ व आई एरंडोल येथे पाण्याच्या टाकीजवळ वास्तव्यास आहे ते २००९ मध्ये लातूर येथे लष्करात भरती झाले होते ते सीमा सुरक्षा दलात सेवेत होते . पत्नी व दोन मुलींसह ते पंजाब मध्ये राहत होते शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल येथील त्यांच्या भावाला फोनवरून त्यांचे अकस्मात निधन झाल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली.

आठवडाभरापूर्वी चाळीसगावचा जवान शहीद झाल्याची घटना ताजी असताना एरंडोलच्या जवानाचे निधन झाल्याने जिल्हा शोकविव्हळ झाला आहे

Protected Content