वीज बिलांबाबत निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन : आ. महाजनांचा इशारा (व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी । राज्य सरकारने वाढीव वीज बिलांची सक्तीची वसुली सुरू करत सर्वसामान्यांसह शेतकर्‍याची थट्टा सुरू केली आहे. सरकारने तातडीने बिले कमी करून सक्तीची वसुली थांबवावी अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचा इशारा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिला.

आज आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेरात विराट मोर्चा काढून वीज वितरणच्या कार्यालयात टाळे ठोकून निषेध करण्यात आला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना आ. गिरीश महाजन यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी ते केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चे काढत आहेत, आंदोलन करत आहेत. राज्याच्या सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक घोषणा दिल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांना अडचणीत मदत मिळाली नाही. सरकारच्या सर्व घोषणा फसव्या ठरल्या. सरकारने सातबारा उतारा कोरा करण्याची घोषणा केली होती. त्या बाबतीत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळाले नाही. राज्यातील शेतकरी संकटात असताना या सरकारने कानावर हात ठेवले, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

https://www.facebook.com/508992935887325/videos/707206623301410

 

Protected Content