वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात स्फोट ; तीन कर्मचारी जखमी

blast

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माण कारखान्यात आज सकाळी अचानक झालेल्या स्फोटात तीन कमर्चारी जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास वरणगाव फॅक्टरीमधील ट्रेझर लोडींग विभागात सकाळी सचिन उत्तम सपकाळे (वय 35) रा. वरणगाव फॅक्टरी, गणेश नामदेव धांडे (वय 45) रा. भुसावळ आणि नितीन प्रभाकर पाटील (वय 39) रा. वरणगाव फॅक्टरीत बंदुकीच्या गोळीत दारू भरण्याचे काम करत असतांना अचानक स्फोट झाला. यातील गणेश धांडे आणि सचिन सपकाळे हे डीबी वर्कस म्हणून काम करतात तर नितीन पाटील ज्युनियर वर्क मॅनेजर म्हणून आहेत. या स्फोटात तिघेजण गंभीर जखमी झाले असून जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघेही 40 ते 45 टक्के भाजले गेले. तिघांच्या चेहऱ्यावर छातीवर पोटावर गंभीर जखमा झालेल्या आहेत.

Protected Content