संकटात असलेल्या गाईच्या मदतीसाठी गौसेवकांची धाव

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भल्या पहाटे पोलीस लाईन समोर एक गाय जीव वाचविण्यासाठी तळमळत असता 5.30 वाजता रेल्वे कर्मचारी डिगंबर महाजन यांनी बघीतले. त्यांनी शहरातील गौसेवक रोहित महाले यांच्याशी संम्पर्क साधला असता त्यांनी घटनास्थळ गाठत पशुवैद्यकीय डॉ. प्रदीप श्रीखंडे यांच्या मदतीने गाईचे प्राण वाचविले. गाईने विषारी पदार्थ खाल्याने त्या गाईला विषबाधा झाली होती. थंडीमुळे गाईचे तापमान 92 डिग्री झाले होते, त्यामुळे तिला सलाईन लावण्यात आली.
शहरात गाई व गौवंश चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील महिन्यात बाजारपेठेतून चार गाई कार मध्ये घेऊन गेलेले दृश्य गौप्रेमीनीं बघितले होते. याचे निवेदन देण्यात देखील देण्यात आलेले आहे. डिगंबर महाजन, डॉ. प्रदीप श्रीखंडेए रोहित महाले, बल्लु थायडे व समस्त गौप्रेमीनी मेहनत घेतली. आपल्या भागात गौमता किंवा मुका जीव संकटात असल्यास गौसेवक महालेंनी आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन केलेले आहे.

Protected Content