भुसावळात पाच कोरोना बाधीत आढळले; दीपनगरातही शिरकाव

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये भुसावळमध्ये पाच रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून यामुळे आता जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची संख्या ४५५ इतकी झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार- जिल्ह्यातील भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ काॅलनी, गांधीनगर व दिपनगरातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

भुसावळात आधी फक्त शहरात रूग्ण आढळून येत होते. तर गत काही दिवसांपासून ग्रामीण भागातील रूग्णांची संख्यादेखील वाढली आहे. यात आजच्या रिपोर्टमधून दीपनगरमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content