ट्रक्टर चालकासह कुटुंबियाला मारहाण; एमआयडीसी पोलीसात चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोरनार शिवारात असलेल्या शेतातून ट्रॅक्टरने जात असलेल्या कुटुंबियाला रस्त्यावर आडवून चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सविस्तर असे की, संजय अहिरे रा. डोमगाव ता.जि.जळगाव हे शेतकरी आहे. शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास संजय अहिरे ट्रक्टर घेवून बोरनार शिवाराती शेतात जात असतांना भिकन रतन सांगोरे, लोटन भिकन सांगोरे, भरत रतन सांगोरे आणि अमोल भरत सांगोरे सर्व रा.डोमगाव ता.जि.जळगाव यांनी ट्रक्टरचा रस्ता अडविला. यावेळी संजय अहिरे आणि त्यांची पत्नी मनिषा अहिरे यांनी चौघांना समजविण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यातील भिकन सांगोरे याने लोखंडी शिंगाड्याने संजय अहिरेच्या डोक्यात मारले. यात ते गंभीर जखमी झाले. हे पाहून संजय अहिरे यांचा भाऊ व वडील यांनी सोडवा सोडव केली. चौघांनी अहिरे कुटुंबियाला मारहाण केल्या प्रकरणी मनिषा अहिरे यांच्या फिर्यादीवरून चौघावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवदास चौधरी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.