मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर आज होणार विराजमान

kishori pednekar

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा न केल्यामुळे आज, होणारी निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या महापौर तर उपमहापौरपदी अ‍ॅड. सुहास वाडकर यांची निवड निश्चित आहे.

 

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेने पालिका मुख्यालयाबाहेर जय्यत तयारी केली आहे. पालिका मुख्यालय परिसर भगवामय करण्यासाठी भगव्या झेंड्यासह शिवसैनिकांना गर्दी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक पार पाडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करणार आहेत. यासाठी हुतात्मा चौक येथे मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

Protected Content