सावद्यात चार महिन्यांचे अर्भक आढळल्याने खळबळ !

सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील मोठा आखाडा परिसरात आज सकाळी ९ ते १० च्या दरम्यान एका अंदाजे चार ते पाच महिन्यांचे अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. निष्पाप बालक अशा अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने परिसराची पाहणी केली असून, हे अर्भक येथे कसे आले आणि त्याचे पालक कोण आहेत, याचा कसून तपास सुरू केला आहे. या गंभीर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून, आज संध्याकाळपर्यंत सावदा पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत गुन्हा नोंदवला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

एका निष्पाप बालकाला अशा प्रकारे सोडून दिल्याच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून सत्य समोर आणतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Protected Content