यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा तत्कालीन नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास नागरीकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे.
सावखेडा सिम येथे आज (दि.१९) बुधवार रोजी डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, याकरीता अत्य आवश्यक असलेले ई-श्नम कार्डची मोफत नोंदणीचे अभियान सुरू केले. आज सार्वजनिक दुर्गा मित्र मंडळ सावखेडासिम तालुका यावल येथे निशुल्क ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास सुरुवात करण्यात आली.
सदर अभियानास सावखेडा गावातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एकूण २७८ लाभार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घेतला या अभियानाचे उद्घाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सावखेडासिम ग्रामपंचायतच्या सरपंच सौ बेबाबाई पाटील, उपसरपंच मुबारक तडवी , विकास पाटील, वसंत पाटील, लक्ष्मण पाटील (ग्रामपंचायत सदस्य ) ,भूषण पाटील, कालू तडवी प्रकाश पाटील , विनोद पाटील, श्री सलीम तडवी, खतीब तडवी, श्री मुबारक तडवी आदींची उपस्थिती होती.
सदरील अभियानास दिनेश पाटील, सलीम तडवी सर,सागर लोहार, विशाल बारी, जयवंत माळी, चेतन कापुरे यांचे योग्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले.