जामनेरात आजी-माजी सैनिकांचा सन्मान

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर येथे तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह निमित्त सैनिकांनो तुमच्यासाठी या कार्यक्रमांतर्गत आजी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

 

तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह साजरा केला जात असून या माध्यमातून सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जामनेर तहसील विभागातर्फे सुमारे ५० आजी व माजी सैनिकांचा तहसीलदार नानासाहेब आगळे व नायब तहसीलदार प्रशांत निंबाळकर यांच्या हस्ते प्रशक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक व नागरिक कार्यक्रमात उपस्थित होते.

Protected Content