कोविड घोटाळ्यात मुंबईच्या माजी महापौरांवर गुन्हा दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

 

सध्या कोविड घोटाळा गाजत असून यातीलच बॉडी बॅग खरेदीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रापाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर या महापौर असताना कोविड उपचारांच्या औषधांची खरेदी करण्यात आली होती. पण ही खरेदी वाढीव दराने करण्यात आली होती. किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच हे कंत्राट देण्यात आलं होतं असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अलीकडेच कोविड घोटाळ्याच्या प्रकरणात उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आल्यानंतर आता त्यांच्याच गटाच्या पेडणेकर या गोत्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content